पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएल बस सेवा पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. पाच महिन्यानंतर पीएमपीएल रस्त्यावर धावणार आहे.  22 तारखेला गणेश चतुर्थीला पीएमपीएलचा श्री गणेशा होण्याची शक्यता आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करण्याचा पीएमपीएल प्रशासनाचा निर्णय घेण्यात आला आहे.  यासंदर्भात पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे पीएमपीएल प्रशासनानं बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार यांनी तत्त्वतः मान्यता दिली असून २२ तारखेला गणेश चतुर्थीला पीएमपीएलचा श्री गणेशा होण्याची शक्यता आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी उत्सव अतिशय साधेपद्धतीने साजरे केले जात आहेतं. यंदाच्या गणेशोत्सवावर देखील कोरोनाचं सावट आहे.


या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना मंदिरातच होणार आहे. इतकी वर्षे कोतवाल चावडीत भव्य मांडव उभारून गणपतीची परतिष्ठापना होत होती. ही १२७ वर्षांची परंपरा पहिल्यांदाच खंडित होणार आहे. कोरोनाच्य पार्श्वभूमीवर मंडळांने सामाजिक भान जपत हा निर्णय घेतला आहे.



दरवर्षी एखाद्या ऐतिहासिक मंदिराची  प्रतिकृती उभारून त्यात बाप्पा विराजमान व्हायचे. यावर्षी मात्र मांडव किंवा मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार नाही. अतिशय साधेपद्धतीने आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्शिंगचे सर्व नियम पाळत गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे.