परभणीत : लाच स्वीकारतांना एपीआय एसीबीच्या जाळ्यात अडकलाय. शेतामधील अंजनाची झाड का तोडली म्हणून शेतकऱ्याकडे सात हजारांची लाच मागितली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आलंय. हनुमंत पांचाळ असं लाचखोर सहाय्यक पोलिसाचं नाव आहे.


दरम्यान, रायगडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. रायगड जिल्ह्याच्या  खालापूर तालुक्यातील वावरले गावाच्या हद्दीतील रस्त्यालगत मोकळ्या जागेत रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत गुर चोरणा-या टोळीकडून तीन बैल आणि एका गाईची हत्या केल्याची गंभीर घटना समोर आलीय.


या घटनेने प्राणीमित्र आणि गावकारी आक्रमक झालेत. गुर चोरांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी होतेय.