पिपंरी-चिंचवड : पार्किंगमध्ये खेळत असलेल्या एका पाच वर्षीय बालकाचं रविवारी अपहरण करण्यात आलं. त्याच्या सुटकेसाठी ५ लाख रुपयांची खंडणीही मागण्यात आली. मात्र, वाकड पोलीस आणि गुन्हे शाखा यांनी संयुक्तरित्या कारवाई करत अपहरणकर्त्यांना जेरबंद केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच अपहरण झालेल्या बालकाची यशस्वी सुटका केली. सुफियान नासिर खान असं सुटका करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे. सुफियान हा नेहमीप्रमाणे इमारतीच्या पार्किंगमध्ये खेळत होता. दरम्यान त्याठिकाणी आलेल्या अपहरणकर्त्यांनी कशाचे तरी आमिष दाखवून 'सुफियान गाडीपे बैठ' असे म्हणून पळवून नेलं होतं.


दोन दिवस खंडणीसाठी कोणाचाही फोन आला नाही. यामुळे पोलीसही चक्रावून गेले होते. मात्र, खंडणीसाठी फोन येताच पोलिसांची चक्र वेगानं फिरली. मुख्य आरोपीला मदत करणाऱ्या पहिल्या आरोपीला वाकड पोलिसांनी प्रथम ताब्यात घेतलं. त्यानंतर गुन्हे शाखा आणि वाकड पोलिसांनी सापळा रचून मुख्य आरोपीला अटक करत मुलाची सुखरुप सुटका केली. मोहम्मद शकील अहमद खान आणि शाहरुख मिराज खान अशी अटक केलेल्या आरोपीची नावं आहेत.