कोटयवधींची मालमत्ता जमविणाऱ्या नितीश ठाकूर याला अटक
निलंबीत उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर याला पोलिसांनी अटक केली आहे. नितीश ठाकूर तथा एन. जे. ठाकूर निलंबित उपजिल्हाधिकारी आहेत.
अलिबाग / मुंबई : निलंबीत उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर याला पोलिसांनी अटक केली आहे. संयुक्त अरब अमिरातच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नितीश ठाकूर तथा एन. जे. ठाकूर निलंबित उपजिल्हाधिकारी आहेत.
कोटयवधींची बेहिशोबी मालमत्ता
1988 ते 2010 या काळात उपजिल्हाधिकारी असताना कोटयवधींची बेहिशोबी मालमत्ता जमवली होती. 2013 मध्ये त्याला निलंबित करण्यात आले होते.भारतातून पळून जाताना मुंबई विमानतळावर पकडले होते. 2 एप्रिल2013 ला त्याने हा प्रयत्न केला होता. ते एअर इंडियाच्या सकाळी11.25 च्या विमानाने काठमांडूला निघाला होता. पण तो सापडला. त्यावेळी त्याला चौकशी करणार्या पोलिसांकडे सोपवण्यात आले नाही, ना त्याचा पासपोर्ट जप्त केला गेला. तेव्हापासून तो फरार आहे.
ठाकूर दुबईला पळून जाण्यात यशस्वी
अंमलबजावणी संचालनालयाने ठाकूरची 134 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. जून2013 मध्ये एसीबीने त्याला फरार घोषित केले होते. त्याच वर्षी त्याच्या मुंबईसह रायगड व अन्य ठिकाणच्या मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. देशाबाहेर जाऊ नये यासाठी मार्च 2014मध्ये त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस बजावली होती. पण तरीही ठाकूर दुबईला पळून जाण्यात यशस्वी ठरला.