रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला पोलिसांनी पकडले
रेमडेसिवीरचा ( Remdesivir) मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. आता काळाबाजार करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला पोलिसांनी पडकले आहे.
नाशिक : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) हाहाकार पाहायला मिळत आहे. काही प्रमाणात कोरोना बाधितांचा आकडा कमी झाला तरी कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनासाठी महत्वाचे औषध म्हणून रेमडेसिवीरची (Remdesivir) मागणी वाढली आहे. रेमडेसिवीरचा राज्यात तुटवडा जाणवत आहे. मात्र, काळ्याबाजारात रेमडेसिवीर मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. रेमडेसिवीरचा ( Remdesivir) मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. आता काळाबाजार करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला पोलिसांनी पडकले आहे. त्यामुळे आता मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता आहे.
के के वाघ कॉलेजवळ रेमडेसीवीरचा ( Remdesivir) काळाबाजार करणाऱ्या टोळीचा म्होरक्याला पोलिसांनी पकडले आहे. पकडला. पालघरमधून कंपनीत काम करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला ताब्यात घेण्यात आले आहे. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात काळाबाजर होत होता. याआधी काही लोकांना पकडण्यात आले आहे. यात महिलांचा समावेश आहे. या महिला परिचारक म्हणून काम खासगी रुग्णालयात काम करत होत्या.
पालघरमधून मुख्य सुत्रधाराकडून 63 इंजेक्शन पोलिसांनी जप्त केली आहेत. यात लेबल नसलेले 62 तर 1 इंजेक्शन लेबल असलेले आहे. आतापर्यंत या टोळीकडून 85 इंजेक्शन ताब्यात घेण्यात आली आहेत. महिनाभरात विविध गुन्ह्यात नाशिक जिल्ह्यात 110 इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत. (Black market for sale of Remdesivir continues in Nashik)
दरम्यान, आतापर्यंत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. नाशिक पोलिसांनी जादा दराने विक्री करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेतले आहे. रेमडेसीवीरची जादा दराने विक्री करणाऱ्या चौघांना आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चार संशयित आरोपींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या तीन महिला खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. पुन्हा एकदा रेमडेसिवीर काळाबाजार होत असल्याने नाशिक पोलिसांनी कार्यवाहीचा बडगा उचलला आहे.
त्याआधी नाशिक शहरात कोरोना प्रतिबंधक औषधांचा काळाबाजार अद्यापही सुरू असल्याचे समोर येत आहे. हाय प्रोफाईल होंडा सिटी गाडीतून रात्रीच्या सुमारास अंधारात रेमडेसिवीर इंजेक्शन विकली जात आहेत. अमोल रमेश जाधव आणि निलेश सुरेश धामणे या दोन तरुणांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या तरुणांकडून रेमडेसिवीर औषध आणि गाडी जप्त केली आहे.