नागपूर : नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अर्धवट जेवण दिल्याची बातमी झी मीडिया ने दाखवल्यावर अर्धवट जेवण देणाऱ्या केटरर्स वर कारवाई करीत पोलीस विभागाने या केटरर्स ची सेवा तात्काळ बंद केली आहे.


काय ठरलं होतं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीकृष्ण केटरर्स असे या केटरर्स चे नाव आहे. नागपुरात हिवाळी अधिवेशनास सोमवार पासून सुरवात झाली आहे. अधिवेशनाच्या सुरक्षे करीता सुमारे ५ हजार पोलीस कर्मचाऱ्यांची तैनाती करण्यात आली आहे. विविध पॉईंट्स वर या कर्मचाऱयांना तैनात करण्यात आले आहे. याच पॉईंट्स वर पोलिसांना जेवण उपलब्ध करून देण्याची सोय पोलीस विभागाने केली आहे. याकरिता १० रुपयात चपाती, २ भाज्या, वरण, भात, सलाद, लोणचे, पापड व एक स्वीट देण्यात येणार होते. 


केवळ वरण-भातावरच समाधान


मात्र काही पॉईंट्स वर पोलिसांना केवळ वरण-भातावरच समाधान मानावे लागले. याबाबतचे वृत्त झी मीडियाने प्रसारित केल्यावर पोलीस प्रशासनाने जेवण पुरविणाऱ्या संबंधित कटरर्स ची सेवा बंद करण्यात आल्याची माहिती दिली. शिवाय नागपूर पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी व पोलीस कल्याण विभाग पोलीस कर्मचाऱ्यांच्या भोजन, निवास व इतर व्यवस्थेवर सतत लक्ष ठेऊन आहेत व कोणालाही असुविधा होणार नाही याची काळजी घेत असल्याचे पोलीस खात्याकडून सांगण्यात आले आहे.