अंबर : नववर्षाच्या स्वागताला अनेक जण मद्यपान करतात आणि तशाच अवस्थेत गाड्या चालवतात. यामुळे एकीकडे अपघातांची संख्या वाढत असतानाच दारूमुळे आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. 


विम्को नाक्यावर नाकाबंदी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबरनाथ पोलिसांनी अंबरनाथ पश्चिमेच्या विम्को नाक्यावर नाकाबंदी तर लावलीच, शिवाय बाजूलाच दूध वाटप केलं. 


पोलिसांनी आग्रहाने दूध पाजलं


नाकाबंदीसाठी थांबवलेल्या वाहनचालकांना आणि पादचा-यांना पोलिसांनी आग्रहाने दूध पाजलं. दारूपासून दूर राहून दूध प्या आणि तंदुरुस्त राहा असा संदेश यावेळी पोलिसांनी दिला. यावेळी तब्बल १०० लिटर दूध यावेळी वाटण्यात आलं.