नागपूर : नागपूरच्या जुनी कामाठी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आणि सहायक निरिक्षकात फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडलीये. पोलिसांचं वाहन ठाण्यात आणण्यास उशीर झाल्याचा जाब विचारल्यावरून ही घटना घडलीये. घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२९ मार्चच्या रात्री पोलीस कर्मचारी देवानंद गणवीर यांनी जेवायला जाण्यासाठी वाहन नेलं. ठाण्यात परत आल्यावर उशीर झाल्याबद्दल सहायक पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी त्यांना जाब विचारला. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. नंतर मुद्द्याचा वाद गुद्द्यावर आला आणि गणवीर आणि चव्हाण यांच्यात जुंपली. पोलीस ठाण्याच्या फाटकातच दोघांमध्ये हाणामारी झाली. या घटनेनंतर गणवीर यांना निलंबित करण्यात आलंय.