पुणे : कबीर कला मंच आणि रिपल्बिकन पॅंथरच्या कार्यालयावर पोलिसांनी धाडी मारल्यात. मुंबई पुण्यासह नागपूरमध्ये धाडसत्र सुरु आहे. एल्गार परिषदेनंतर उसळलेल्या दंगलीनंतर ६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद झाली होती. त्यानंतर १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे दलित समाजातील लोकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती. त्यानंतर राज्यभर ३ जानेवारी रोजी बंद पाळण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एल्गार परिषद झाली, आणि एक जानेवारीला भीमा कोरेगावमध्ये दलित समाजातील लोकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती. त्यानंतर राज्यभर तीन जानेवारी रोजी बंद पाळण्यात आला होता. या घटनेनंतर ७ जानेवारी २०१८ रोजी कबीर कला मंचच्या ४ जण आणि रिपब्लिकन पँथरच्या चार जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.या घटनेनंतर ७ जानेवारी २०१८ रोजी कबीर कलामंचचे सागर गोरखे,ज्योती जगताप, रमेश गायचोर, दीपक ढेंगले  आणि रिपब्लिकन पँथरचे सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.



या प्रकरणात आज पहाटेपासून कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यालय आणि घरावर पोलिसांच्या धाडी सुरु आहेत. पुण्यातील कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या घरावर तर मुंबईत रिपब्लिकन पँथरच्या कार्यालयावर पुणे पोलिसांनी धाडी टाकल्या आहेत. तपास काम सुरू आहे.