निवडणुका येऊ द्या तुमची मस्ती उतरवतो; उद्धव ठाकरेंचा इशारा
मुंब्र्यातील शाखेला भेट देण्यापासून पोलिसांनी उद्धव ठाकरेंना रोखलं. सरकारला सत्तेचा माज आलाय. निवडणुका येऊ द्या तुमची मस्ती उतरवतो असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. ...
Uddhav Thackeray : ऐन थंडीत ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. मुंब्र्यातील शाखेला भेट देण्यापासून पोलिसांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांना रोखले. सरकारला सत्तेचा माज, निवडणुका येऊ द्या तुमची मस्ती उतरवतो अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला इशारा आहे.
पोलिसांनी उद्धव ठाकरेंना रोखले
मुंब्रा शिवसेना शाखेजवळ शनिवारी जोरदार राजकीय नाट्य पाहायला मिळाला. शिवसेना शिंदे गटानं पाडलेल्या मुंब्र्यातील शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे तिथं आले होते. मात्र शिवसेना शाखेजवळ पोहोचण्याआधीच त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला... त्यामुळं शिवसेना ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले. उद्धव ठाकरेंनी स्वतः गाडीबाहेर येऊन पोलीस अधिका-यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्तेही रस्त्यावर जमले होते. त्यांनी ठाकरेंना काळे झेंडे दाखवले.तब्बल अर्धा-पाऊण तास मुंब्र्याच्या रस्त्यावर हे नाट्य सुरू होतं. अखेर शाखेमध्ये न जाताच उद्धव ठाकरे माघारी परतले.
उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावर जोरदार निशाणा
उद्धव ठाकरे मुंब्रा येथे पोहचले मात्र, पोलिसांनी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर त्यांना बॅरिकेट्सच्या पुढे जावून शाखा पाडलेल्या परिसराची पाहणी करण्यास मज्जाव केला. उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना पाहणी करण्याची परवानगी द्यावी यासाठी विनंती केली. पण पोलिसांनी सुरक्षेचं कारण देत त्यांना बॅरिकेट्सच्या पुढे जाऊ दिलं नाही. अखेर उद्धव ठाकरे यांनी लांबूनच शाखेची पाहणी केली आणि ते परत फिरले. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.
हिंमत असेल तर पोलिसांना बाजुला ठेवा
हिंमत असेल तर पोलिसांना बाजुला ठेवा असे चॅलेंजच उद्धव ठाकरे यांनी दिले. निवडणुका येऊ द्या तुमची मस्ती उतरवतो असा इशारा देखील उद्दव ठाकरे यांनी दिला. खरा बुलडोझर काय असतो दाखवायला आलो आहे. सरकारला सत्तेचा माज आलाय असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका करताना शिंदे गटावर निशाणा साधला आहे. दिवाळीत कुठे गोंधळ नको म्हणून मी दाखवला. नाही तर आम्ही देकील बॅरिगेट्स तोडून जाऊ शकलो असतो. महाराष्ट्राची दिवाळी वाईट होवू नसे म्हणून संयम ठेवला.
शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
उद्धव ठाकरे मुंब्र्यात पाडलेल्या शिवसेना शाखेच्या पाहणीसाठी आले होते. उद्धव ठाकरे यांनी मुंब्र्यात येऊ नये यासाठी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. तसेच संबंधित शाखेच्या परिसरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील मोठी गर्दी केली होती.