अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : (Loksabha election 2024) लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर पवार कुटुंबातून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. (NCP) राष्ट्रवादीशी थेट संबंध असणाऱ्या या नेत्यानं राज ठाकरे यांना खुलं आव्हान दिल्यामुळं आता या टीकेला ठाकरेंकडून नेमकं काय आणि कसं उत्तर मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना, (Raj Thackeray) 'राज ठाकरे दिल्लीतून, गुजरातमधून आदेश आले की तसंच वागायला लागतात', असं म्हणत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी नाराजीचा तीव्र सूर आळवला. प्रत्यक्षात राज ठाकरे हे नाव युवा नेत्यांमध्ये आणि राजकारणाच्या वर्तुळात नव्यानं प्रवेश करणाऱ्या अनेकांमध्येच कमालीचं लोकप्रिय. रोहित पवारही यास अपवाद नाहीत. पण, सध्या मात्र त्यांची भूमिका काहीशी बदललेली दिसत आहे. 


'मी त्यांचा (राज ठाकरे) फॅन होतो. पण आज महाविकास आघाडीत फूट पाडण्यासाठी त्यांचा वापर होत आहे. अशा पक्षांना सामान्य लोक सुपारीबाज पक्ष आणि सुपारीबाज नेते असं म्हणतात' अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिरांवर ताशेरे ओढले. 


आता शेवटी लोक शेवटी भूमिका घेत आहेत, येत्या काळातही घेतील. मतदार योग्य व्यक्तीला निवडून देतील असं म्हणत रोहित पवार यांनी त्यांना खुलं आव्हान दिलं. 'राज ठाकरेंनी हिंमत असेल तर फडणवीसांविरोधात यांच्या विरोधात बोलावं. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम भाजपनं केलं आहे. द्वेष निर्माण केला जात आहे. याब्बदल राज ठाकरेंनी बोलावं', असं ते म्हणाले. 


हेसुद्धा वाचा : अजित पवारांच्या जीवाला धोका? गृह विभागाच्या सूचना येताच पोलीस अलर्ट


 


पाच वर्षात काय बदलल की तुम्हाला झुकावं लागत आहे? असा सवाल करताना लोक निर्णय घेतील खड्यासारख कुणाला बाजूला करायचं अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंना आणि पर्यायी महायुतीला सावधगिरीचा इशाराही दिला. दरम्यान, रोहित पवार यांनी एकिकडे राज ठाकरे यांच्या भूमिकेसंदर्भात नाराजीचा सूर आळवलेला असतानाच तत्पूर्वी त्यांच्या एका X पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. 



सुपारीचा फोटो शेअर करत, '#सुपारीबाज पक्षाला #सुपारी खूपच लागलेली दिसतेय... पार घायाळ झालेत... पण महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही तर स्वाभिमानी आहे. कुणाच्याही सांगण्याला भुलणारी नाही, म्हणून केवळ मतं खाणाऱ्या इतर पक्षांनीही याचा विचार करावा.' असं लिहिलं होतं. त्यामुळं त्यांचं हे ट्विट आणि शब्द नेमके कोणासाठी हे आता अधिकच स्पष्ट झालं आहे.