पुणे: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे राजकारण ढवळून निघत आहे. पूजाच्या मृत्यूनंतर 20 दिवसांनी संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर देखील पूजाची आजी आणि भाजप नेते यांचा आक्रमक पवित्रा कायम असल्याचं दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यामध्ये पूजा चव्हाणच्या आजीने पोलीस ठाण्यात ठाण मांडला आहे. तृप्ती देसाई आणि पुजाची आजी शांताबाई राठोड यांनी वानवडी पोलीस स्टेशनच्या बाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे. पूजाच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या जात आहेत.


जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही असा निर्धार या आजीने केला आहे. नार्को टेस्ट करा सत्य बाहेर येईल अशी मागणी यावेळी पूजा चव्हाणच्या आजीने केली आहे. त्यांच्या या मागणीची दखल घेणार का याकडे देखील सर्वाचं लक्ष लागलं आहे. 



'या' मंत्र्यांकडे वनखात्याच्या मंत्रिपदाचा कारभार सोपवला जाण्याची शक्यता


 पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण राठोड यांना भोवलंय आणि राजीनामा द्यावा लागलाय. राजीनामा देतो पण चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनामा स्वीकारु नका, अशी विनंती राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना केल्याचं समजतंय. पूजा चव्हाणनं आत्महत्या केल्यानंतर २० दिवसांनी राठोडांनी राजीनामा दिला आहे.
 
विरोधकांबरोबरच स्वपक्षीयांकडून दबाव वाढल्यामुळे वनमंत्री संजय राठोड यांना अखेर आपला राजीनामा द्यावा लागला. सरकार स्थापन झाल्यापासून अवघ्या सव्वा वर्षात एका गंभीर आरोपामुळे एका मंत्र्याला पायउतार व्हावं लागलं. त्यामुळे सरकारच्या प्रतिमेला मोठा तडा गेला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला आपली इमेज सावरण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत.