मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अनेक व्हिडीओ क्लीप आणि फोटो समोर आले आहेत. या प्रकरणात आता भाजप नेत्या चित्रा वाघा यांनी देखील उडीत घेतली असून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी 17 दिवस उलटूनही गुन्हा का दाखल केला नाही? भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा संतप्त प्रश्न उपस्थित केला आहे. तर पुणे पोलिसांकडून हा तपास काढून घ्यावा अशी मागणी देखील केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पोलिसांकडून तपास काढून सक्षम आयपीएस अधिका-याकडे तपास देण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. 



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवेदनशील आहेत. आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत असंही चित्रा वाघ म्हणाल्या. तर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. 


संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची चित्रा वाघ यांनी मागणी केली. एवढे पुरावे असून अद्याप साधा एफआयआर का दाखल झाली नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.