पुणे : स्वाभिमानाची शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची पुण्यात बैठक होते आहे. या बैठकीचं निमंत्रण कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना देण्यात आलेलं नाही. या बैठकीत सदाभाऊ खोत यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.


सदाभाऊ खोत यांना पक्षातून काढण्याचा प्रस्ताव येण्याचीही शक्यता आहे. तसचं या बैठकीत कर्जमाफी, राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील ताणलेलया संबधामुळे ही बैठक वादळी होण्याची शक्यता आहे. त्याआधी सदाभाऊ खोत यांनी शेतकरी नेत्यांवर टीका केली होती.