कल्याण : कल्याण डोंबिवलीमध्ये शहरातील रस्त्याची दयनीय अवस्था झालीं आहे. पालिकाक्षेत्रातील रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य पसरले असून गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तर पालिका प्रशासनाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा केला आहे. कल्याण डोबिवलीचे मुख्य रस्ते कॉक्रीटचे असले तरी अंतर्गत रस्त्याची तर अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप वक्त होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्त्यांवर गाडी चालणं तर दूर साधं पायी चालणं ही अवघड झालं आहे. नागरिकांमध्ये यामुळे संतापाचं वातावरण आहे. दुर्गाडी चौक ते शीळफाटा रस्ता हा एमएसआरडीसीच्या अंतर्गत येतो. मात्र सहाजनंद चौक ते पत्रीपूल हे अंतर पार करण्यासाठी अर्धा अर्धा तास लागत आहे. नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता आपल्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगत केडीएमसी आपले हात झटकून टाकत आहे. 


कल्याणकरांना मात्र याचा त्रास सहन करावा लागतो आहे. गेल्या काही दिवसांत पावसाने उघडीप दिली होती. त्या दरम्यान रस्त्यातील खड्ड्यात केवळ खडी टाकून खड्डे भरण्यात आले. मात्र ही खडी केव्हाच उडून गेली आहे. पुन्हा खड्डे पडल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे एकंदर परिस्थिती पाहता गणपती बाप्पांचे आगमन कल्याणकरांना खड्ड्यांमधूनच करावे लागेल असे दिसत आहे.