अमर काणे, झी मीडिया, नागपूर : राज्याच्या उपराजधानीत अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. महापालिका प्रशासनाकडे याबाबत अनेकांनी तक्राही केली. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात झाल्यानं दुखापत झाल्यामुळं नागपुरातील एका दुचारीस्कारानं तर थेट याकरात जबाबदार अधिकारी आणि राजकर्त्यांविरोधात पोलिसातच तक्रार केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजीव रंजन सिंग नागपुरातील लक्ष्मीनगर परिसरात रहतात. दोन दिवसांपूर्वी ते मित्र आजारी असल्यानं त्याला भेटण्यासाठी दुचाकीने फ्रेंण्ड्स कॉलनी परिसरात गेले होते. फ्रेंडस कॉलनी परिसरातील रस्ते खड्डेमय आहेत. शिवाय रात्रीच्या वेळेस रस्त्यावरील पथदिवेही बंद असतात. त्यामुळं दुचाकीस्वारांची या परिसरातून जातांना कसरत असते. याच खड्डेमय रस्त्यांमुळं राजीवरंजन सिंग यांचा दुचाकीवरून पडून अपघात झाला. त्याच्या पायाला जबर दुखापत झाली.


फ्रेंण्डस कॉलनीप्रमाणे शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले आहे. त्यामुळं झालेल्या अपघातात अनेक जण गंभीर जखमीही झालेल्यांची संख्यांही  
मोठी आहे. याबाबत सर्वसामान्य नागरिकांनी वारंवरा महापालिका प्रशासनाकडे तक्रारही केल्यात..मात्र ढीम्म प्रशासनाची रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्षचं नाही.


राजीव रंजन सिंग यांनी मात्र खड्ड्यामुळं अपघातात दुखापत झाल्यानंतर याबाबत थेट पोलिसातच तक्रार केली. माझा अपघात प्रशासनाच्या चुकीमुळं झाला असून अपघातासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार आणि महापालिका प्रशासन जबाबदार असल्याची तक्रार त्यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यांत दिली आहे.


शहरातील काही रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी थातूरमातूर डागडुजी प्रशासन केली. मात्र त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यांची अजूनच दुरावस्था झाली आहे. करदात असतानाहीच्या प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे आणि हलगर्जीपणामुळे रस्त्यांची ही अवस्था झाली आहे.