ठाणे: जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलच धारेवर धरत, लवकरात लवकर खड्डे बूजवा असा दमच भरला.  तसेच, अधिकाऱ्यांचे फोटो आणि फोन नंबर प्रत्येक नाक्यावर लावा. म्हणजे लोक त्यांना फोन करून खड्यांविषयी माहिती देतील, अशी सूचनाही एकथान शिंदेंनी यावेळी केली. कल्याण-डोंबिवलीतल्या खड्ड्यांचा आढावा घेताना त्यांनी अधिकाऱ्यांना दम भरला.


ठाणे खड्ड्यात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, ठाण्यात अनेक महत्त्वाचे रस्ते आहेत. मात्र, सध्या पडत असलेल्या सतत पावसामुळे इस्टर्न एक्प्रेस हायवेवर अनेक ठिकणी खड्डे पडलेत. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय. आनंद नगर  मुलुंड चेकनाक्यापासून घोडबंदर रोड आणि नाशिक रोडपर्यंत अनेक ठिकणी ईस्टर्न एक्प्रेसवर खड्डे आहेत. आणि आतापर्यंत फक्त या खड्यांचा त्रास प्रवाशांना होत होता. आता या खड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामनाही प्रवाशांना करावा लागतोय.


झी २४ तासच्या पाठपुराव्यानंतर महापौरांना जाग


पावसाळ्याच्या सुरवातीलाच ठाण्यात खड्यांच साम्राज्य पसरलंय. वारंवार झी २४ तासनं ठाण्यातील खड्यां संदर्भात बातम्या दिल्यात. बातमीची दखल घेउन ठाणे महापालिका प्रशासनाला अखेर जाग आलीय. प्रशासनानं महापौरांना घेउन खड्यांची पाहणी करत खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केलीय. महापौरांनीही अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला आणि अनेक ठिकणी खड्डे बुजवण्याचं काम सुरु झालं.