गुहागरमध्ये मुख्य रस्त्याची दुरावस्था, आरोग्य केंद्रात जाण्यास रूग्णांची होतेय गैरसोय
गुहागर तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या भातगाव कडे जाणारा आवरे-असोरे-शिवणे-कोळवली- भातगाव या रस्त्याची दुरावस्था झालीय.
गुहागर : गुहागर तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या भातगाव कडे जाणारा आवरे-असोरे-शिवणे-कोळवली- भातगाव या रस्त्याची दुरावस्था झालीय. या रस्त्यावरूनचं प्राथमिक आरोग्य केंद्रास जाण्याचा मार्ग असल्याने रूग्ण व नातेवाईकांची मोठी गैरसोय होतेय. हा रस्ता दुरुस्तीसाठी अनेकदा मागणी करण्यात आली होती. मात्र याकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. मात्र आता पावसाळ्यात पायपीट व गाडी चालवणे आणखीणचं अवघड होत असल्याने ग्रामस्थांकडून रस्ता दुरुस्तीची मागणी जोर धरतेय.
भातगाव कडे जाणारा आवरे-असोरे-शिवणे-कोळवली- भातगाव या रस्त्याची दुरावस्था झालीय. या रस्त्यावरून प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ जाण्याचा मार्ग आहे. तसेच भातगाव- कोळवली-पाचेरी सडा-शिवणे-असोरे -आवरे आदी पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी याचं रस्त्यांचा अवलंब करतात.तसेच बाजारहाट, बँका, पतसंस्था, विज, दूरध्वनी आदी कामासाठी देखील नागरिक याच रस्त्याचा उपयोग करतायत. मात्र या रस्त्यांची दुरावस्था झाल्याने नागरीकांची मोठी गैरसोय झालीय. तसेच अनेक रूग्णांना देखील हाच रस्ता असल्याने रूग्णांची मोठी हेळसांड होती.
एकंदरीत सर्वंच नागरीकांना या रस्त्यामुळे वाहतूक करणे व चालणे अवघड बनले आहे. या मार्गावरून परिसरातील अनेक गावातील नागरिक विविध कामांसाठी आबलोली,गुहागर या ठिकाणी येत असतात मात्र रस्त्यावर पडलेले मोठे मोठे खड्डे, उखडलेले डांबरीकरण यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे.
सदरचा मार्ग गेली कित्येक वर्ष दयनीय अवस्थेत असून वर्षानुवर्षे नागरिकांनी मागणी करूनही या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही.आता रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला असून सदर रस्त्याच्या दुरुस्तीकडे सर्व स्तरावरील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेने लक्ष घालून सदर रस्ता सुरक्षित वाहतुकीसाठी उपलब्ध करावा अशी मागणी केली जात आहे.