मुंबई : दहावी- बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याबद्दलच्या सूचना महाराष्ट्र शिक्षममंडळाने दिल्या आहेत. त्यासाठी गरजेचे असणाऱ्या सर्व उपाय योजना करुन या परीक्षा घेण्यात याव्यात अशा सूचना राज्य मंडळाने दिल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 5 ते 22 एप्रिल तर दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा या 12 ते 28 एप्रिलदरम्यान होणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी अनेक संकटांना सामोरे जावे लारणार आहे.


दहावीच्या परीक्षेसाठी यावर्षी 1 लाख 83 हजार 611, तर बारावीच्या 1 लाख 51 हजार 847 अशा एकूण 3 लाख 35 हजार 458 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.


शाळा आणि महाविद्यालयांनी प्रात्यक्षिक परीक्षा सुरक्षित पार पाडण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थी संख्येनुसार बॅचचे करण्याच्या सूचना राज्य मंडळाने शाळा आणि महाविद्यालयांना दिल्या आहेत, असे बोर्डातील अधिकाऱ्यांनी सांगितले.