Heat Strokes: उष्माघाताने माणसंच काय, बिबट्याचा मृत्यू झालाय! उन्हात फिरताना अशी घ्या काळजी...

Heat Strokes Prevention Tips: महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उष्णतेची लाट आली आहे. राजधानी दिल्लीत तर उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. या वर्षी तापमानाने आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे. राजस्थानात 21 मे रोजी उष्माघातामुळं एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. उष्णतेचा फटका वन्य जीवांनादेखील बसला आहे. अशावेळी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याची माहिती जाणून घेऊया. 

| May 30, 2024, 18:11 PM IST
1/7

उष्माघाताने माणसंच काय, बिबट्याचा मृत्यू झालाय! उन्हात फिरताना अशी घ्या काळजी...

 LEOPARD dead due to HEAT STROKE in Rajasthan how to take care from heat stroke

अजमेरच्या सोमलुर जंगलात एका बिबट्याचा मृतदेह आढळला होता. शवविच्छेदन अहवालात उष्माघातामुळं या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. उन्हाळ्यात खूप जास्त तहान लागल्याने पाण्याच्या शोधात बिबट्या फिरत होता. भुक आणि तहान यामुळं बिबट्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

2/7

 LEOPARD dead due to HEAT STROKE in Rajasthan how to take care from heat stroke

 उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत आहे. त्यामुळं अनेक उष्माघाताची प्रकरणे समोर येत आहेत. उष्माघातामुळं स्ट्रोकसारख्या समस्याही निर्माण होऊ शकतात. या समस्या टाळण्यासाठी पाणी पिणे खूप गरजेचे आहे. उष्माघात टाळण्यासाठी काय करु शकतो, हे जाणून घेऊया. 

3/7

उष्माघाताची कारणे

 LEOPARD dead due to HEAT STROKE in Rajasthan how to take care from heat stroke

भर उन्हात अतिकष्टाची कामे करणे किंवा तापमान जास्त असलेल्या ठिकाणी काम करणे. घट्ट कपडे वापरणे  

4/7

उष्माघाताची लक्षणे

 LEOPARD dead due to HEAT STROKE in Rajasthan how to take care from heat stroke

मळमळणे, नैराश्य, डिहायड्रेशन, ब्लड प्रेशर वाढणे, चक्कर येणे, भरपूर घाम येणे. 

5/7

काय काळजी घ्याल?

 LEOPARD dead due to HEAT STROKE in Rajasthan how to take care from heat stroke

शरीरात पाण्याचे प्रमाण पुरेसे असणे गरजेचे असते. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. उन्हात बाहेर जाताना डोक्यावर टोपी किंवा स्कार्फने झाकावे. पाणी पिणे, ओआरएस, ताक, लस्सी प्यावे. उन्हातून घरात आल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नका. तसंच, बाहेरुन आल्यानंतर लगेचच थंड पाण्याने अंघोळ करु नका. थोडावेळ शांत बसून मग फ्रेश व्हायला जा.  

6/7

 LEOPARD dead due to HEAT STROKE in Rajasthan how to take care from heat stroke

उन्हात बाहेर फिरताना सौम्य रंगाचे कपडे घाला. कॉटनचे कपडे घालावे. अतिकष्टाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी करावीत. जेव्हा सूर्यप्रकाश प्रखर नसेल तेव्हाच अशी कामे करा. 

7/7

Disclaimer

 LEOPARD dead due to HEAT STROKE in Rajasthan how to take care from heat stroke

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)