ताडोबात जिप्सींच्या विळख्यात जंगलाचा राजा, पर्यटनासाठी नवे नियम लागू

Tadoba National Park : चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी प्रकल्पात आता टायगर सफारीला जात असाल तर ही बातमी नक्की वाचा, ताडोबा अभयारण्यात नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने पर्यटक तसंच जीप्सी चालकांसाठी हे नियम असणार आहेत.

May 29, 2024, 21:06 PM IST
1/7

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातला एक गंभीर प्रकार उघडकीस आला. टी 114 वाघिणीला घेराव करून डझनभर जिप्सी उभ्या असल्याचा हा फोटो व्हायरल झाला. पर्यटकांच्या गराड्यात ताडोबाची वाघिण सापडली होती.

2/7

17 मे रोजीच्या या फोटोने प्रशासन हादरुन गेलं. आता उशिराने डोळे उघडलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने पर्यटक तसंच जीप्सी चालकांसाठी नवे नियम लागू केलेत.

3/7

वाघिणीला घेरल्याप्रकरणी 10 जीप्सी, त्यांचे वाहनचालक आणि गाईड्सना एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आलंय

4/7

ताडोबा व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने याआदी 15 जिप्सी, त्यांचे वाहनचालक आणि गाईड यांना निलंबित केलं होतं

5/7

व्याघ्र प्रकल्पात आता पर्यटक जिप्सींना रिव्हर्स घेण्यावर बंदी घालण्यात आलीय. तसंच ताडोबा सफारीत प्लॅस्टिक बॉटल्सना बंदी आहे.. तरीही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचंच या व्हिडिओतून दिसून आलं होतं.

6/7

सफारीदरम्यान यु-टर्न मारण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आलाय. ताडोबात वाघ बघण्यासाठी पर्यटक हे जिप्सी चालकांवर तसंच गाईडवर दबाव टाकत असल्याचा आरोप होतो. 

7/7

राज्यातून देशातून नव्हे तर जगभरातूनही पर्यटक फक्त वाघ पाहण्यासाठी या प्रकल्पात येतात.. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन आणि बफर क्षेत्रात पर्यटन सुरू आहे. मात्र, ताडोबात नियम मोडण्याची ही आतापर्यंतची सर्वात भीषण घटना असल्याचं सांगितलं जातंय..