जयेश जगड, झी मीडिया, अकोला : प्रहार संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या हत्येची चौकशी CID (सीआयडी) मार्फत करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरीचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. ते आज पुंडकर यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी अकोटात आले होते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुंडकर यांची हत्या कॉन्ट्रॅक्ट किलरच्या माध्यमातून करण्यात आली असल्याचं पोलिसांनी म्हंटलंय. तुपकर यांनी प्रस्थापितांच्या विरुद्ध काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना राज्य सरकारने संरक्षण देण्याची गरज असल्याचंही म्हंटलंय. राज्य सरकार कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभे न राहिल्यास भविष्यात चळवळ संपणार अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. 



या हल्ल्यात मारेकरींनी  पूंडकर यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या होत्या यातील दोन गोळ्या तुषार पुंडकर यांच्या पाठीत लागल्याय.गंभीर जखमी झालेल्या तुषार फुंडकर यांना अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांनी पुढील उपचार करिता अकोला नेण्याचा सल्ला दिला होता. मात्र उपचारादरम्यान त्यांचा अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळावर एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली आहेत.
 
तुषार फुंडकर अकोलाचे पालकमंत्री बच्चू कडू यांचे विश्वासू होते. तुषार पुंडकर यांच्या माध्यमातून प्रहार संघटनेने जिल्ह्यात चांगली प्रगती करायला सुरुवात केली होती आणि त्यामुळे हत्या राजकीय द्वेषातून करण्‍यात आली आहे का ? या अनुषंगाने देखील पोलिस पुढील तपास करीत आहे.
 
सोबतच काही दिवसांपूर्वी अवैध उत्खनन करणाऱ्यांची लेखी तक्रार पुंडकर यांनी संबंधित विभागाला दिली होती. त्यामुळे पोलीस याबाबतही तपास करीत आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांनी मारेकरी लवकरच अटक करण्यात येईल अशी ग्वाही दिली होती.