`काय झाडी, काय डोंगार...` पावसाळ्यात वीकेंड एन्जॉय करण्यासाठी जाऊ शकतो का प्राजक्ताच्या फार्महाऊसला? भाडं जाणून घ्या
Prajakta Mali Farmhouse : पावसाळ्यात निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला जायची मजाच काही और आहे. मित्र परिवार किंवा कुटुंबासोबत वन डे ट्रीपचा प्लान करतात.
Prajakta Mali Farmhouse : पावसाळा म्हटलं की, कोसळणारे धबधवे, हिरवीगार झाडी, उंच डोंगर आणि गरमा गरम भज्जीसोबत मस्त गरमा गरम चहा...पावसाळा सुरु झाला की मुंबई, पुणेकर विकेंडला वन डे ट्रीपचा प्लान करतात. मित्र परिवार असो किंवा कुटुंबासोबत पावसाळ्यात धमाल मस्ती करण्याची मजा काही वेगळीच असते. अशात निसर्गाच्या सान्निध्यात तुम्हाला वन डे ट्रीपसाठी जायचं असेल तर अभिनेत्री प्राजक्ता माळीचा फार्महाऊस हा उत्तम पर्याय आहे.
किती मोठं आहे प्राजक्ताचं फार्महाऊस?
प्राजक्तकुंज हे फार्महाऊस हिरवेगार डोंगराळ परिसरात वसलेलं आहे. या फार्महाऊसमध्ये 3 बेडरुम, 4 बाथरुम, लिव्हिंग रुम आणि मोठं असं स्विमिंग पूल आहे. कुटुंब किंवा मित्र परिवासोबत वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. आजूबाजूला डोंगरावरुन कोसळणारे धबधबे हे या फार्महाऊसचं खास आकर्षण आहे. आधुनिक आणि मॉडर्न असं दोन्हीची सुंदर सांगड या फार्महाऊसच्या सजावटीत दिसते. सुंदर असे गार्डन आणि वेगवेगळ्या झाड्यांमध्ये फोटोसेशनसाठी तुम्हाला भरपूर पर्याय आहे. या फार्महाऊसमधील स्वयंपाकघरात ओव्हन, गॅस अशा सुविधा दिलेल्या आहेत. पण या फार्महाऊसमध्ये जेवण बनवायला बंदी आहे.
फार्महाऊसचं भाडं किती?
या फार्महाऊसमध्ये एकाचवेळी 15 पेक्षा जास्त लोक राहू शकतात. मीडिया रिपोर्टनुसार, प्राजक्तकुंज फार्महाऊसमध्ये राहण्यासाठी दिवसाला 15 हजार ते 30 हजार रुपये मोजावे लागतात. जेवणाचा खर्चही तुम्हाला वेगळा करावा लागतो. शनिवार रविवारी एका दिवसासाठी 30 हजार रुपये मोजावे लागतील. तर सोमवार ते शुक्रवार दरम्यान हेच एका दिवसाचं भाडं 17 ते 20 हजार रुपये आहेत.
प्राजक्तकुंज फार्महाऊस कुठे आहे?
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर म्हणजे कर्जतमधील गौळवाडी या गावात प्राजक्ताचं फार्महाऊस आहे. चित्रपट आणि शोद्वारे कमाई करणारी प्राजक्ता या फार्महाऊसमधूनही दणकट कमाई करत आहे.