जेडीएस काँग्रेसची सत्ता 3 महिन्यांपेक्षा जास्त टिकणार नाही - प्रकाश आंबेडकरांंचे भाकित
कर्नाटकामध्ये सध्या सत्ता संघर्ष सुरू आहे.
मुंबई : कर्नाटकामध्ये सध्या सत्ता संघर्ष सुरू आहे. नेमके कोण सरकार स्थापन करणार? कोण आणि कसा घोडेबाजार बाजार करणार? अशा चर्चा सध्या देशभरात रंगत आहे. जेडीएस आणि कॉग्रेसमध्ये फॉर्म्युला ठरला असून बुधवारी कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात असे सांगितले जात आहे.
प्रकाश आंबेडकरांची भविष्यवाणी
कर्नाटकातली जेडीएस काँग्रेसची सत्ता तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही अशी भविष्यवाणी, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. पंढरपूरमध्ये आयोजित धनगर समाज सत्ता संपादन मेळाव्यात ते बोलत होते. आगामी निवडणुकीच्या तोंडावर जातीय दंगली, किंवा भारत पाकिस्तान युद्धाची शक्यताही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी वर्तवली आहे.