Prakash Ambedkar : मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्व राजकीय पक्ष विधानसभेपर्यंत झुलवत ठेवतील, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी केलीय. मराठा आरक्षणाबाबत राजकीय पक्षांची काय भूमिका आहे,  याबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांना पत्र लिहिले होते. मात्र कोणीही उत्तर न दिल्यामुळं आंबेडकरांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना  देखील खास सल्ला दिल्ला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंगोलीच्या कळमनुरी येथे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला, लोकसभेमध्ये काय झालं आणि विधानसभेमध्ये काय करायला पाहिजेत यावर या मेळाव्यात चर्चा झाली, 26 जुलै पासून आरक्षण बचाव यात्रा निघणार आहे, यासंदर्भात हिंगोलीत प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा पार पडला, मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटलांना जाहीर केलेल्या 288 जागा लढण्याचा सल्ला दिलाय.


मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरु


मनोज जरांगे पाटील आजपासून अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसलेत... ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करावा या मागण्यांसाठी  त्यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केलंय.. गेल्या वर्षभरातलं जरांगेंचं हे 5वं आमरण उपोषण असेल.जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 13 जुलैची डेडलाईन दिली होती. मात्र राज्य सरकारकडून मागण्या पूर्ण न झाल्याने त्यांनी पुन्हा उपोषणाचा निर्णय घेतलाय. राज्यातले 288 उमेदवार पाडायचे की उभे करायचे याचा निर्णयही होणार असल्याचं समजतंय..


विधानपरिषद मतं फुटीप्रकरणी काँग्रसच्या 7 आमदारांवर कारवाई करणं चुकीचं होईल. चंद्रकांत हांडोरे यांना ज्यांनी पाडलं त्यांची नावं काँग्रेस समोर आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार का?, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केलाय. गेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरेंचा पराभव झाला होता. त्यावरून हांडोरेंना पाडणा-यांवर कारवाई करताना काँग्रेसमधील मनुवाद बाहेर येईल का, असं आंबेडकरांनी म्हटलंय.