मयुर निकम, झी मीडिया , बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात 'वंचित'कडून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भारिपचे अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा पार पडली. सभेदरम्यान त्यांनी उपस्थितांना आपल्या वंचित बहुजन आघाडीला मत द्या असे आवाहन केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी यावरही प्रकाश आंबेडकर बोलले. बुलढाण्यातील 'वंचित'च्या सर्वच उमेदवारांना आपण निवडून दिलं पाहिजे. सत्ता आल्यावर नक्कीच बदल करणार हे बोलत असताना त्यांनी भाजप, ईडी आणि आयकर विभागावरही ताशेरे ओढले.


आम्ही ईडीला , इन्कमटेक्सला आणि दादागिरी करणाऱ्या भाजप सरकारलाही घाबरत नाही, असे खडे बोल प्रकाश आंबेडकरांनी यांनी सुनावले आणि एकप्रकारे भाजपला इशाराच दिला.