मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीच्या आरक्षण धोरणामूळे ओबीसी विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. अकोला येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यामूळे २०१७ पासून ओबीसीचे अकरा हजार विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देश पातळीवरील ‘ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ऑधर बॅकवर्ड क्लासेस’नी ही आकडेवारी जाहीर केली. ‘नीट’द्वारे प्रवेशामध्ये ओबीसींचे २७ टक्के आरक्षण दिले नाही. भारतीय राज्यघटनेच्या ९३ व्या दुरूस्तीनुसार केंद्र शासनाने ओबीसींना २७ टक्के आरक्षण देणे आवश्यक आहे. मात्र, नीटमार्फत होत असलेल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ओबीसींचे आवश्यक आरक्षण २०१७ पासून कमी केले आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील सर्वसामान्य विद्याार्थी वंचित राहिले आहेत, असे अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.


 या मुद्द्यावर लवकरच राज्यभरात मोठं आंदोलन उभारू, असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला आहे.  या आंदोलनासाठी कोरोनाच्या नियमानांही झुगारून लावणार असल्याचा इशारा आंबेडकरांनी दिला आहे. कोणत्याच आमदाराला सध्या निवडणूक नको आहे. त्यामूळे साध्याच सरकार पडण्याची शक्यता नसल्याचं मत आंबेडकरांनी व्यक्त केलं आहे. 


महाराष्ट्रातील सरकार कधी पडेल हे ज्योतिषी देवेंद्र फडणवीस यांनाच विचारा असा टोलाही यावेळी आंबेडकरांनी लगावला आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेचंही आंबेडकरांनी यावेळी समर्थन केल आहे. राज्यपालांचं वर्तन राज्य घटनेला अनुसरून असल्याचं आंबेडकर म्हणाले आहेत. 



 चीनचे सैन्य आतमध्ये किती आले हे सरकारने सांगावे, चीनचे सैन्य दोन किमी मागे सरकल्याचे आज सांगण्यात आले. हे सर्व फसवे काम सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला.