प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींवर टीका
प्रकाश आंबेडकरांची टीका
सोलापूर : पंतप्रधानांनी देश विकायला काढलाय अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलीय. सोलापूर जिल्ह्यात प्रकाश दौऱ्यामध्ये त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी अक्कलकोट तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर त्यांनी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधान रेल्वे, एअरपोर्ट विकायला निघाले आहेत. एअरपोर्ट नफ्यात आहे तरी विकत आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जेव्हा गरजा पूर्ण होत नाहीत तेव्हाच अशा पद्धतीने विकायला काढलं जातं अशी टीका आंबेडकरांनी केली.
'महाविकास आघाडी सरकार हे तीन पायाचं असून ज्याच्याकडे सहकार खातं आहे ते तिसऱ्या पायाला शेतकऱ्यांना मदत करू देण्यात अडथळे निर्माण करत असल्याचे म्हणत त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. महाराष्ट्र राज्यातील आणि इतर राज्यातील धरणे एकमेकांवर अलंबवून असून त्यांच्यात एक समन्वय समिती आहे. मात्र ती व्यवस्थित कार्यरत नाहीये असे ते म्हणाले.
अन्नधान्य भिजलेली आहेत अनेकांची अशा वेळी खावटी किंवा किमान १५ दिवस पुरेल इतकं धान्य वगैरे शासन पुरवतं. किती जनावरे वाहुन गेली, जमिन नुकसान ची सर्व माहिती शासनानेकडे आहे. मात्र टोलवाटोलवी सुरू आहे, ती कृपया थांबव पाहिजे असे आंबेडकर म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी फक्त एका जिल्ह्यात पाहणी केली, त्यांनी पावसामुळे बाधित झालेल्या इतर ही जिल्ह्यात जावं अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. पूर्ण नुकसान शासन कधीच भरून देता येत नाही पण मुख्यमंत्री जाणं म्हणजे एक दिलासा असतो.पूरग्रस्त लोकांना अद्याप कोणतीही मदत पोहोचली नसल्याचे ते म्हणाले.
सोलापूरात १ लाख ४५ हजार हेक्टर शेतीचे नुकसान, २३० घरांची पडझड, ४ जण बेपत्ता तर १४ जण मयत आहेत. दरम्यान ३२ हजार जणांना स्थलांतरीत केलंय. केंद्राकडून पैसे येतील तेव्हा येतील पण राज्याच्या तिजोरीतून मुख्यमंत्र्यांनी आता मदत करावी अशी विनंती त्यांनी केली.
महत्वाचे मुद्दे
तीन पायाचं हे सरकारमधील एक पाय मदत जाहीर करू नये म्हणून दुसऱ्यावर दबाव टाकत असल्याचा मला वास येत आहे.
पुढच्या महिन्यात साखर कारखान्याला मदत कऱयाच आहे म्हणून हात अखडला गेला असल्याचा आमचा आरोप आहे.
२५ ऑक्टोबरला बीड भगवानगड पायथ्याशी ऊस तोड कामगारांची परिषद आम्ही बोलवली आहे
महागाई वाढलेली आहे. कोरोनाची परिस्थिती आहे. ऊस तोड कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे
उजनीच्या पाण्याचं राजकारण होतं यात दुमत नाही, पाणी जर नियोजनाने सोडलं असत तर परिस्थिती गंभीर नसती
त्यांनी खावटी म्हणून ओला दुष्काळग्रस्त भागातील सर्वांना ५ हाजर रुपये जाहीर करावेत