औरंगाबाद : 'महाराष्ट्रातील मतदारांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत, हा कौल दिला होता. भाजपच्या नेतृत्वामधील महायुतीच्या बाजूने कौल होता. अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुन्हा मुख्यमंत्री झाल्याबद्दले देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अचानक घडलेल्या या राजकीय भूकंपाचे हादरे सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना बसले. कोणाच्या मनातही आली नसेल अशी ही घटना होती. यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. राजकीय वातावरण अचानक तापलं. पुन्हा बैठका सुरु झाल्या. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. 


'शिवसेनेने काँग्रेससोबत जाण्य़ाचं महापाप केलं असं देखील ते यावेळी म्हणाले. 'शिवसेना राष्ट्रवादी, काँग्रेससोबत गेली ते बरोबर असतं. पण राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपसोबत गेले तर ते चुकीचं असतं. अशी दुहेरी भूमिका योग्य नाही. नरेंद्र मोदी आणि महायुतीच्या नावे मते मागितली.'