मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना - भाजप युती झाली तरी दोन्ही पक्षात मोठी नाराजी उफाळून आली आहे. कारण अनेक ठिकांणी जागांची अदलाबदल केली आहे. त्यामुळे हे अनेकांना रुचलेले नाही. काहींनी बंडाचे निशाण फडकविले असून बंडखोरीची तयारीही केली आहे. तर काहींनी बंडखोरी करत अपक्ष अर्जही दाखल केले आहेत. तर काहींनी पक्षाशी फारकत घेत विरोधी पक्षात जाणे पसंत केले आहे. नाशिक येथे भाजपला मोठा फटका बसला आहे. येथे दोन मोठे नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. तर पालघरमध्ये शिवसेनेने जिल्हा परिषद गटनेते अखेरचा जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालघरमध्ये शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता आहे. पालघर जिल्हा परिषदचे शिवसेना गट नेता प्रकाश निकम यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र  केला आहे. विक्रमगड मतदार संघातून प्रकाश निकम २०१४ मध्ये शिवसेनेकडून लढले होते. त्यांनी भाजपचे विष्णू सावरा यांना कडवी झुंज दिली होती. यावेळी ते पुन्हा विक्रमगड मतदार संघातून इच्छुक होते. 


मात्र हा मतदार संघ भाजपकडे गेल्याने ते नाराज झालेत. शिवसेनेचा येथे दावा असताना हा मतदार भाजपला सोडला गेल्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन पक्षाला रामराम ठोकला आहे. दरम्यान प्रकाश निकम हे 'मनसे'च्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.