सोलापूर : मोदी सरकार देशाच्या तिजोरीतील पैसे काढून देशाची अर्थव्यवस्था कोलमडून टाकणार असल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटबंदीला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. याच मुद्द्यावर काँग्रेस भाजप सरकारवर टीका करत आहे. नोटबंदीमुळे सामन्यांना त्याचा मोठा फटका बसला. अशी टीका काँग्रेसने केली आहे. याच मुद्द्यावर काँग्रेसने देशभरात आंदोलन करत नोटबंदीचा विरोध केला.


२ वर्षांपूर्वी म्हणजेच ८ नोव्हेंबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री ८ वाजता नोटबंदीची घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदर्शनवरून देशाला संबोधीत करताना ५०० अाणि १ हजार रुपयांच्या नोटा बंद करत असल्याचे जाहीर केले होते. पण ज्या उद्देशाने नोटबंदी केली तो उद्देश खरंच साध्य झाला का ? नोटबंदीचा देशाला फायदा झाला का? या निर्णयामुळे सर्वसामान्यांना काय मिळालं असे प्रश्च विरोधक सरकारला विचारत आहेत.


दरम्यान आज छत्तीसगढमध्ये प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर कडाडून हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचं राजकारण एका कुटुंबापासून सुरू होतं आणि त्या कुटुंबाभोवतीच संपतं अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी गांधी घराण्यावर टीका केली आहे. 


काँग्रेसच्या काळात देशाचा विकास अतीसंथ गतीने झाल्याचा आरोप मोदींनी केला आहे. गांधी मायलेक जामिनावर बाहेर असताना नोटबंदीवर टीका करत असल्याचा उल्लेख मोदींनी यावेळी केला. नोटबंदीमुळे यांना जामिनासाठी अर्ज करावा लागला. जे जामिनावर बाहेर आहेत ते मोदींना सर्टीफिकेट देणार काय असा सवाल मोदींनी यावेळी सभेत केला.