सातारा : सातारा-कराड मलकापूर भागात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. नगरपालिकेकडून पाण्याच्या निच-याची सोय केली नसल्याने नागरिकांच्या घरात पाणी जाऊन घरातील साहित्याचं नुकसान झालं. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पाण्यात भिजू नये म्हणून वाचवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. घरांसोबत मलकापुरातील कृष्णा हॉस्पिटलमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. त्यामुळे रुग्णालयातही कर्मचाऱ्यांची पाण्याचा निचरा करण्यासाठी धावपळ सुरू होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मलकापूर नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे दरवर्षी या कुटुंबांच्या  घरात पाणी शिरते त्यामुळे नगरपालिकेने वेळीच उपाय योजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मे महिन्यात झालेल्या पाऊसामुळे अनेकाच्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तर पावसाळ्यात काय होईल असा प्रश्न उपस्थित केला. त र यावर नागरिकांनी देखील संताप व्यक्त केला.