सागर आव्हाड, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Pune News Today:  पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच एका क्षुल्लक कारणामुळं झालेल्या वादातून महिलेला तिचे मुल गमवावे लागले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील वाघोली येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी महिलेने आज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Pune Crime News Today)


पाणी भरताना वाद


मिळालेल्या माहितीनुसार, पाणी भरताना शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत भांडण झाले. त्याचवेळी या रागातून शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने महिलेच्या पोटात लाथ मारली. पोटाला मार लागल्याने महिलेचा गर्भपात झाला आहे. वाघोली येथे हा प्रकार 15 जुलै रोजी घडला आहे. या प्रकरणी 25 वर्षांच्या महिलेने लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केले आहे. रोहित रवी धोत्रे आणि शांताबाईल रवी धोत्रे अशी आरोपींची नावे आहेत.


गर्भवती महिलेला मारहाण


मिळालेल्या माहितीनुसार,गर्भवती महिला त्यांच्या घराजवळील सार्वजनिक नळावर पाणी भरत होत्या. यावेळी त्यांच्या शेजारी राहत असलेल्या रोहित धोत्रे याने त्यांचा नळाखाली ठेवलेला हंडा बाजुला केला. त्यावर फिर्यादी महिलेने "माझा नंबर आधी आहे, तू मला पाणी भरु दे. माझे झाल्यानंतर तू पाणी भर" असे सांगितले. मात्र यावरुन त्यांच्यात वाद-विवाद झाले. 


महिलेच्या पोटावर मारहाण 


आरोपी रोहित याने फिर्यादी यांना शिवीगाळ कारायला सुरुवात केली. त्याचे वडिल रवी धोत्रे व आई शांताबाई धोत्रे हे देखील त्या ठिकाणी पोहचले. या दरम्यान रोहित याने महिलेच्या गालावर चापट मारली. इतकंच नव्हे तर रोहित यांच्या त्याच्या आई वडिलांनी देखील महिलेला  हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर रोहित याने महिलेच्या त्यांच्या पोटावर मारहाण केली. काही कळायच्या आतच त्या नळाजवळ खाली पोटावर पालथ्या पडल्या.


महिलेचा गर्भपात 


पोटावरच पडल्यामुळं त्यांच्या पोटात दुखू लागले. त्यामुळं त्या घरी जाऊन झोपल्या. घरी जाऊन झोपल्या असताना त्यांच्या शरीरातून रक्तस्त्राव होऊ लागला. रक्त पाहून त्या घाबरल्या व घडलेल्या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे गेल्यावर डॉक्टरांनी त्यांना गर्भपात झाल्याचे सांगितले, असं महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.