अरुण मेहेत्रे, झी २४ तास, पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार स्थापन होण्याऐवजी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालीय. त्यामुळे आमदारांच्या उत्साहावर विरजण पडलंय. विशेष करून पहिल्यांदाच निवडून गेलेल्या आमदारांवर धडाडीनं कामाला लागण्याऐवजी 'वेट अँड वॉच'ची वेळ आलीय. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ नोव्हेंबरला लागला. निवडून आलेल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी तुफान जल्लोष केला. काही कार्यकर्त्यांनी नेत्यांचा सत्कारही केली. पण निवडून आलेल्या आमदारांना आता पुढं काय? हे कळत नाही. कारण त्यांचा शपथविधीच लांबलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालीय. त्यामुळं नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी लांबलाय. पहिल्यांदाच निवडून गेलेल्या आमदारांच्या उत्साहावर विरजण पडलंय़. शपथविधी लांबल्याची चिंता आमदारांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतेय. पण चारही पक्षाच्या आमदारांना सत्ता आपलीच येणार असा विश्वास आहे.


आमदार म्हणून मिरवण्यात अजिबात अडचण नाही. प्रश्न कामं मार्गी लागण्याचा आहे. राष्ट्रपती राजवट असल्यानं त्याला आमदार निधी मिळण्याबाबत संभ्रम आहे. अशा परिस्थितीत सारं काही 'रामभरोसे' म्हणजेच 'राज्यपाल भरोसे' म्हणण्याची वेळ आलीये.


विनाशपथविधी थोडे दिवस ठिक आहे. पण फार दिवस हे सगळं सहन होणार नाही. ही कोंडी लवकरच फुटेल आणि राज्यात सरकार अस्तित्वात येईल,