राज्यातील `या` जिल्ह्यात पेट्रोलनं ओलांडली शंभरी, जाणून घ्या आजचे दर
राजस्थानमध्ये पेट्रोल- 103.52 रुपये प्रति लिटर आहे. तर महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात पेट्रोलनं 100 ओलांडली आहे.
मुंबई: देशात एकीकडे कोरोनाचं संकट अधिक वाढत असताना महागाईनं सर्वसामान्य आणि गृहिणींचं कंबरडं मोडलं आहे. एक दिवस ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमुळे जवळपास पेट्रोलनं शंभरी ओलांडली आहे तर महाराष्ट्रात पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचलं आहे.
राजस्थानच्या श्रीगंगानगर इथे पेट्रोलची किंमत 103.52 रुपये प्रति लिटर आहे. इंदूर, भोपाल, रीवा, अनूपपूर आणि महाराष्ट्रात जवळपास पेट्रोल 100च्या आसपास पोहोचलं आहे. दिल्लीमध्ये लिटरमागे 24 पैसे तर डिझेलमागे 27 पैशांची वाढ झाली आहे. निवडणूक झालेल्या 5 राज्यांमध्ये 10 दिवसांत पेट्रोल 2.21 पैशांनी महाग झालं आहे.
पेट्रोल-डिझेलचे प्रति लिटरचे आजचे दर
श्रीगंगानगर- पेट्रोल- 103.52, डिझेल- 95.99
अनूपपुर- पेट्रोल- 103.21, डिझेल- 93.98
रीवा- पेट्रोल- 102.85, डिझेल- 93.65
परभणी- पेट्रोल- 100.01, डिझेल- 90.12
भोपाल- पेट्रोल- 100.63, डिझेल- 91.59
पुणे- पेट्रोल- 98.51, डिझेल- 88.66
मुंबई- पेट्रोल- 98.88, डिझेल- 90.4
दिल्ली- पेट्रोल- 92.58, डिझेल- 83.22
कोलकाता- पेट्रोल- 92.67, डिझेल- 86.06
पेट्रोल-डिझेलचे दर रोज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बदलतात. तुमच्या शहारातील पेट्रोल आणि डिझेलचे दर SMS द्वारे देखील पाहू शकता. इंडियन ऑइलचे दर पाहण्यासाठी RSP<डीलर कोड> लिहून 9224992249 या नंबरवर मेसेज पाठवला की आपल्याला दर मिळू शकतील. तर एचपीसीएल ग्राहकांसाठी HPPRICE <डीलर कोड> 9222201122, बीपीसीएलचे दर पाहण्यासाठी RSP<डीलर कोड> 9223112222 या क्रमांकावर मेसेज करू शकतात.