अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती  : अमरावातीतल्या एका नामांकित शाळेत धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाने पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय विद्यार्थ्याचे केस कापून त्याला ‘बॅड टच’ केल्याचा आरोप मुख्याध्यापकावर करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी संबंधित 48 वर्षीय मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. राजापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावतीतील नामांकित पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्याचे केस कापल्याची घटना घडली. सोमवारी हा विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत गेला. 


काही वेळाने मुख्याध्यापकाने त्याला कार्यालयात बोलावलं. विद्यार्थ्याचे केस व्यवस्थित असतानाही केस का वाढले म्हणून ते कात्रीने कापले  विद्यार्थ्याला ‘बॅड टच’देखील पालकांनी तक्रारीत म्हटले आहे. तसंच विद्यार्थ्यांला उन्हात बाहेर उभं करून त्याच्याशी गैरवर्तणूक करण्यात आली.


विद्यार्थी घरी रडत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. धक्कादायक म्हणजे जाब विचारायला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मुख्याध्यापकाने शिविगाळ केली. ही शाळा कोणाचीही आहे माहित आहे का अशी धमकीही मुख्याध्यापकांना दिली. 


विद्यार्थ्यांचे पालकाचे तक्रारी वरून पोलिसांनी मुख्याध्यापका विरुद्ध पोक्सो व भांदविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.