Big Breaking : खासगी लक्झरी बसचा भीषण आपघात, 8 ते 10 प्रवासी गंभीर जखमी
खासगी लक्झरी बसला (Nandurbar Private Bus Accident) अपघात झाल्याचं समोर आलं आहे.
प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदूरबार : या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. खासगी लक्झरी बसला (Nandurbar Private Bus Accident) अपघात झाल्याचं समोर आलं आहे. बसमध्ये एकूम 30 प्रवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी अपघातात 8-10 ते प्रवाशी गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळतेय. जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. (private luxury bus accident in charanmal ghat at nandurbar due to drive leav control on bus 8 to 10 people injured)
ही बस पिंपळनेरकडून सुरतकडे जात होती. या दरम्यान नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात गाडी पोहचली. या दरम्यान चरणमाळ घाटात (Charmal Ghat) तीव्र उतारावर चालकाचे नियत्रंण सुटलं. त्यामुळे बस पलटी झाल्यानं हा आपघात झाला. या अपघातात बसमधील 8 ते 10 प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना नवापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुसळधार पावसात रस्त्याचा अदांज न आल्याने ही बस पलटल्याची प्राथमिक माहिती आहे. बसमधे 30 प्रवासी प्रवास करत होते. प्रवाशांना काही कळायच्या आत बस अपघातग्रस्त झाल्याने एकच टाहो ऐकायला मिळत होता. लहान मुल आणि महिलांच्या रडण्याचा आवाज हृदय पिळवटून टाकणारा होता. रात्रीचा अंधार त्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने मदत कार्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
घाटात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मदत कार्यात अडचणी येत आहेत. तरीही अपघातस्थळी स्थानिक नागरिकांसह पोलीस प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे.