पुणे : महापालिकेची समान पाणी पुरवठा योजना पुन्हा वादात आली आहे.


या योजनेसाठी नियुक्त करण्यात आलेली सल्लागार कंपनी यावेळी वादाचं कारण आहे. सल्लागार कंपनीनं महापालिकेची दिशाभूल केली, चुकीची माहिती दिली. आणि महापालिकेऐवजी ठेकेदाराचं हित पाहिलं. असा ठपका महापालिकेनंच चौकशी अहवालात सल्लागारावर ठेवला आहे. त्याचबरोबर, या सल्लागारावर कारवाई करावी, अशी शिफारस देखील केलीय. तरीही, कारवाई करण्याऐवजी, महापालिका आयुक्त कुणाल कुमार त्यांना पाठीशी घालत आहेत असा होतोय.