रत्नागिरी : पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. समुद्रमार्गे दहशतवादी कारवाया होऊ शकतात यासाठी किनारपट्टी भागात पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात एसटी बसमध्ये स्फोटके सापडली त्यामुळे सागरी सुरक्षा पुन्हा एकदा चर्चेत आली. महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा सागरी किनारा लाभलाय..तर रत्नागिरीत २५० किमी पेक्षा अधिक सागरी किनारा आहे. यासाठी १४ ठिकणी सागरी पोलीस चौकी बांधण्यात आल्या आहेत. सागरी किनाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी १५० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. २४ तास पोलिसांची गस्त या सागरी किनाऱ्यावर असते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी रत्नागिरी पोलीस प्रशासन, सीमाशुल्क विभाग आणि नौदल सज्ज झाले आहे.


सागरी सुरक्षेचा आढावा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुलवामा हल्ल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईतली रेल्वे सेवा आणि मुंबईतली रेल्वे स्थानके यांना प्रामुख्याने लक्ष्य केले जाऊ शकते, असा गुप्तचर विभागाचा अहवाल आहे. अधिक गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. याआधीही रेल्वे गाड्या दहशतवाद्यांचं सॉफ्ट टार्गेट झाल्या आहेत. रेल्वे पोलीस, जीआरपी यांनी सुरक्षेसंदर्भात विशेष पत्रकही जारी केले आहे. दहिसर चेकनाक्यासमोर मॉलमध्ये झालेला छोटा स्फोट आणि रायगडमध्ये एसटीबसमध्ये सापडलेला बॉम्ब यामुळे मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा धोका सुरक्षा दलांनी अधोरेखित केला आहे. 


लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी या दोन्ही घटना घडल्याचा पोलिसांचा दावा आहे. समुद्रमार्गे दहशतवादी कारवाया होऊ शकतात यासाठी किनारपट्टी भागात पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. चौवीस तास पोलिलंची गस्त या सागरी किनाऱ्यावर असते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी रत्नागिरी पोलीस प्रशासन, सीमाशुल्क विभाग आणि नौदल सज्ज झाले आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका पाहता दहशतवादी कारवायांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येक नागरीकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.