पुणे : माता न तू वैरीणी म्हणावं अशी धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुणे पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. कोथरुडमधील अपहरणाचा छडा पोलिसांनी 24 तासांत लावला आहे. पुण्याच्या कोथरुडमधील 4 वर्षांच्या मुलाचं अपहरण झालं होतं. या प्रकरणाची माहि


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याच्या कोथरुडमधील 4 वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा छडा पुणे पोलिसांनी 24 तासांत लावला आहे. या प्रकरणात आईकडूनच पोटच्या मुलाची विक्री 1 लाख 60 हजारात करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.



आईनेच पोटच्या 4 वर्षांच्या मुलाची विक्री का केली. याचं कारण अद्यापही कळू शकलं नाही. पण, पोलिसांनी मुलाची सुखरुप सुटका करून, आईसह 8 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.