पुणे : Vaishnavi Patil dance in Lal Mahal at Pune : लाल महलमध्ये लावणी नृत्याचे शूट झाल्याचा विविध पद्धतीने निषेध व्यक्त होत आहे. आता जिजाऊंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेख घालण्यात आला आहे. पुण्यामध्ये मराठा महसंघातर्फे ज्या ठिकाणी शूट झालं त्या ठिकाणचं शुद्धीकरण करण्यात आले. कार्यकर्त्यांनी इथल्या जिजाऊ मासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण केला. त्यांनतर सभामंडपात गोमूत्र तसेच गुलाबपाणी शिंपडून हा परिसर शुद्ध केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐतिहासिक लाल महलात डान्स करणाऱ्या वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर फरासखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी वैष्णवी पाटील आणि तिच्या तीन साथीदारांनी लाल महालात डान्स करत शूटिंग करुन व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल केले होते. वैष्णवीच्या डान्सनंतर समाज माध्यमातून टीका झाली. तर संभाजी ब्रिगेड सह पुरोगामी संघटनेने या घटनेविषयी आक्रमक पवित्रा घेत इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


लाल महलचं शुद्धीकरण  


मराठा महासंघाकडून लाल महालाचं शुद्धीकरण करणार आहे. लाल महलात लावणी केल्याने शुद्धीकरण केले जाणार आहे, असे जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, लाल महालात नृत्याविष्कार करणाऱ्यांवर गुन्हा करण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी वैष्णवी पाटील आणि तिच्या तीन साथीदारांनी लाल महालात नृत्य करत शूटिंग करुन व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल केले होते. वैष्णवीच्या नृत्यानंतर समाज माध्यमातून टीका झाली होती.



शौर्याची साक्ष देणारा लाल महाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  लाल महालात तमाशातल्या गाण्यांवर मुलींना (Vaishnavi Patil dance in Lal Mahal ) नाचवून बदनाम केला जात आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. लाल महाल उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे महानगर पालिकेकडून बंद ठेवला आहे.  


संभाजी ब्रिगेडचा नेमका काय आहे आरोप?


पुणे महानगर पालिकेकडून लाल महाल बंद असताना. या लाल महालात रिल्स शूट केल्या जात आहेत. हे रिल्स चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर केले जात आहे. या रिल्समध्ये डान्स करणारी वैष्णवी पाटील आणि रिल्स शूट करणारे कुलदीप बापट आणि केदार अवसरे या दोघांनी शूट केले आहे. या तिघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेड कडून करण्यात आली होती.


 संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची तक्रार पुणे पोलीस आयुक्त आणि पुणे मनपा आयुक्त यांच्याकडे देण्यात आली आहे. मात्र पुणे पोलीस प्रशासन तक्रार दाखल करण्यास तयार नाही असं देखील संतोष शिंदे यांनी सांगितलं आहे. मुळात लाल महाल बंद प्रशासनाकडून बंद करण्यात आला आहे. असं असताना ही तिघे आता गेले कसे? हा देखील प्रश्न उपस्थित करण्यात येतोय