मुंबई: दोन जिल्ह्यांमधून दोन मन हेलावून टाकणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांनी मोठी खळबळ उडाली. पहिली घटना म्हणजे जन्मदात्यांनीच काळजाचा तुकडा असलेल्या चिमुकलीला सोडून दिल्याची घटना आहे. तर दुसरीकडे एक दिवसाचं बाळ चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यामध्येच नकुशी झालेल्या चिमुकलीला सोडून दिल्याची घटना समोर आली आहे. जन्मदात्यांनीच अवघ्या 2 महिन्यांच्या चिमुरडीला खराडीतील दर्ग्यात सोडून दिल्याची घटना घडली. 


याबाबत माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटांमध्ये चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चिमुरडीला ताब्यात घेतलं आहे. तर, बाळाला सोडून देणाऱ्या आई-वडिलांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


दुसरीकडे औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातून एक दिवसाचे  बाळ चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र  घाटी हॉस्पिटल कर्मचारी यांची दक्षता  आणि पोलीसांची मदत यामुळं पळवणार्‍या महिलेला पोलिसांनी अवघ्या 2 तासात अटक केली आहे. 


आरोपी महिलेकडून बाळाला ताब्यात घेऊन सुखरूप आईच्या ताब्यात देण्यात आले आहे.  याप्रकरणी महिलेविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बाळाची आई कपडे बदलण्यासाठी गेली असता हे बाळ घेऊन आरोपी फरार झाले.  आईने आरडाओरड करताच डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी धावाधाव सुरू केली, चौकशी केल्यावर एक रिक्षात बसून महिला बाळ घेऊन गेल्याच कळलं.


पोलिसांनी रिक्षा चालकाला पकडलं आणि त्यानं आरोपी महिलेचं घरही दाखवलं. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अवघ्या 2 तासांत छ़डा लावून महिलेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दरम्यान बाळ चोरी प्रकरणात बाळाला विकण्याचा या महिलेचा प्रयत्न होता, हे एक रॅकेट तर नाही ना? याचा ही पोलीस तपास करत आहेत.