पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डीएस कुलकर्णींना पुण्याच्या न्यायालयाने आणखी एक झटका दिला आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरच्या न्यायालयात जाईपर्यंत अटक न करण्याचा डीएसकेंचा अर्ज पुणे कोर्टानं फेटाळलाय. त्यामुळं डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारंच्या ठेवी बुडवल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला होता. 


त्यानंतर डीएसकें यांच्या वकिलांनी वरच्या न्यायालयात जाईपर्यंत अटक न करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र तो अर्जही फेटाळण्यात आल्यामुळे डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. 


दरम्यान, पत्नीचा अटकपूर्व जामीन पुणे जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे डीएसके आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झालाय. मात्र, पोलीस अटक करतात का, याकडे लक्ष लागले आहे.


अटक टाळायची असल्यास डीएसकेंना मुंबई उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. तसंच उच्च न्यायालयात याचिका करेपर्यंत अटक करु नये, असा अर्जही डीएसकेंच्या वकिलांकडून केला जाऊ शकतो. मात्र सध्या तरी डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.