सागर आव्हाड, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणातून मेव्हण्याने दाजीच्या डोक्यात रॉड घालून हत्या केली आहे. त्यानंतर स्वतःदेखील त्याच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच घटना घडली आहे. पुण्यातील बाणेर येथील हॉटेल मनाली परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. 


कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच चतुःश्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. मेव्हणा धनंजय पद्माकर ताडेकर (वय 36) आणि हेमंत रत्नाकर काजळे (वय 40) अशी दोघांची नावे आहेत. या घटनेमुळं कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. 


धनंजय साडेकर याचा काजळे यांच्या बहिणीशी विवाह झाला होता. मात्र, विवाहानंतरही त्यांच्यात सतत वाद होत होते. बहिणीसोबत वाद घालत असल्याच्या रागातून काजळे यांने धनंजयला जाब विचारला यातून दोघात वाद झाले होते. या रागातूनच मोठा अनर्थ घडला आहे. 


वाद सुरू असतानाच साडेकर यांच्या डोक्यात हेमंत काजळे यांनी लोखंडी गज मारला. डोक्यात गज लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली व अति रक्तस्त्राव झाला. यानंतर या घटनेची माहिची काजळेने बहिणीला कळवली नंतर त्याच घरात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर बहिणीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांनाही उपचारांसाठी रुग्णालयात धाव घेतली. मात्र उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता.