पुणे : Pune Building Iron slab Collapesd Case: येरवडा इमारत बांधकाम दुर्घटना प्रकरणी बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सेफ्टी सुपरवायझरसह चौघांना अटक करण्यात आली आहे. कालच उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता. त्याचवेळी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इमारत बांधकाम सुरु असताना स्लॅबची लोखंडी जाळी कोसळून पाच कामगारांचा मृत्यू झाला होता.  या दुर्घटनेच्या चौकशीचे निर्देश पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार चौकशी करुन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. दुर्घटनेत अन्य तीन जण जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


मृत्यू पावलेल्या पाच कामगारांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. मृत कामगारांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत देण्यात येणार आहे. येरवडा - शास्त्रीनगर येथील गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बांधकाम  स्लॅबची लोखंडी जाळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच मजुरांचा मृत्यू झाला. हे मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेलेत. त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.