लग्नानंतर नवऱ्याचे पितळ पडले उघडे, सत्य समजताच बायकोला धक्का; घेतला `हा` निर्णय
Pune Crime: तरुणीने पोलीस ठाणे गाठले असून सासु सासऱ्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
Pune Crime: सध्या समलैंगिक विवाहाच्या अनेक बातम्या आपण वाचतो. एकमेकांच्या संमतीने असे अनेक विवाह पार पडले आहेत. समलैंगिक असणे किंवा विवाह करणे हे कायदेशीर आहे. पण समलैंगिक असल्याचे लपवून मुलीशी लग्न करण्याचा प्रकार पुण्यातून समोर आलाय. मुलगा गे असल्याचे लपवून मुलीशी लग्न लावण्याचा प्रकार आई-वडिलांच्या अंगलट आला आहे. यासंदर्भात तरुणीने पोलीस ठाणे गाठले असून सासु सासऱ्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पुण्यात हा प्रकार समोर आलाय.
नवरा समलैंगिक
पुण्यात 2 वर्षांपुर्वी थाटामाटात एक लग्नसोहळा पार पडला. या लग्नाल दोन्हीकडची मंडळी जमली होती. विवाह संपन्न झाला. मुलगा मुलगी नांदू लागले. यातील मुलगा 28 वर्षीय असून मुलगी ही 34 वर्षांची आहे. मुलगी पुण्यातील वडगाव शेरी परिसरात राहते. पण लग्न झाल्यानंतर नवऱ्याचे पितळ उघड पडले. नवरा समलैंगिक असल्याचे लक्षात आल्याने पत्नीला धक्का बसला. तिला याबद्दल कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती.
माहेरुन पैसे आणण्यासाठी दबाव
फसवणूक करुन आपले लग्न केल्याचे तिच्या लक्षात आले. पण उशीर झाला होता. जगासमोर लग्न लागल होतं. अशावेळी बाहेर सगळे नाव ठेवतील, असे तिच्या मनात आले. पण फसवणूक झाल्याची तिने सासु-सासऱ्यांकडे विचारणा केली. पण यापुढे तिच्या मनाविरुद्ध आणखी गोष्टी घडू लागल्या. पीडितेला सासु-सासऱ्यांकडून मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. तिच्याकडे माहेरुन पैसे आणण्यासाठी मागणी होऊ लागली. सास-सासऱ्यांकडून पीडित सुनेकडे कारची मागणी करण्यात आली. दिवसेंदिवस वाढू लागल्याने गोष्टी सहन करण्यापलीकडे जावू लागल्या होत्या.
गुन्हा दाखल
या सर्वाला कंटाळून फिर्यादी महिलेने पोलीस स्टेशन गाठले आणि नवऱ्यासह सासु-सासऱ्यांविरोधात तक्रार दिली. स्वतःचा मुलगा ''गे'' असल्याचे माहित असूनसुद्धा लपवून ठेवली आणि लग्न लावले अशी तक्रार तिने पोलिसांत दिली. पीडितेचा नवरा आणि सासरच्यांविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात 498 (अ), 420, 504,34 कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. चंदन नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.