एकतर फूकट, वरती दादागिरी... पुण्यात काजूकतलीसाठी मुलाने चक्क पिस्तूलने धमकावलं
Sinhagad Road News: हल्ली दादागिरी करत गोष्टी चोरण्याचा आणि लंपास करण्याच्या घटना (crime news) हळूहळू वाढू लागल्या आहेत. सध्या तरूणांमध्येही हे प्रमाण वाढल्याचे दिसते. पुण्यात अशीच एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. यामुळे (pune news) नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: हल्ली दादागिरी करत गोष्टी चोरण्याचा आणि लंपास करण्याच्या घटना (crime news) हळूहळू वाढू लागल्या आहेत. सध्या तरूणांमध्येही हे प्रमाण वाढल्याचे दिसते. पुण्यात अशीच एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. यामुळे (pune news) नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यात काजूकतली फूकट खायला मिळावी म्हणून एक अज्ञान तरूणानं चक्क दुकानादारावर (pune kajukatli news) गोळीबार करत त्याच्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. सुदैवानं यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी या घटनेनं पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरले आहे. (pune crime news firing at sweet mart for not giving free kaju katali latest news)
काजूकतली फुकट दिली नाही म्हणून स्वीट मॉलमध्ये गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथे घडली आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल (sweet mall pune) जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे मुख्य रस्त्यालगत फुलपरी स्वीट मॉल आहे. सोमवारी या दुकानात दोन तरुण आले त्यांनी एक किलो काजू कतली घेतली मात्र दुकानदाराने पैसे मागितल्यावर त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर त्या तरुणांनी त्या दुकानदारावर गावठी पिस्तूल रोखून गोळी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र गोळी बाहेर आली नाही. त्यानंतर त्या तरुणांनी (sinhgad road pune firing) पुन्हा पिस्तूल नीट तपासून गोळी झाडली. मात्र गोळी दुकानातच पडली.
हेही वाचा - वसईत घडलं गॅंगवॉर! व्यक्तीवर 12 वेळा तलवारीने हल्ला; तलवारही वाकली
काय घडली घटना?
या सर्व गोंधळात त्या ठिकाणी गर्दी जमल्याचे पाहून आरोपींनी धूम ठोकली. घटनेनंतर दुकानदारांनी खेळण्यातील बंदूक समजून त्या घटनेकडे दुर्लक्ष केले. मात्र व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुने यांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस (police) निरीक्षक शैलेश संखे यांना झालेला प्रकार सांगितला. पोलिसांनी घटनेचे सीसीटिव्ही फुटेज तपासले तसेच दुकानात बंदुकीतून पडलेली गोळी ताब्यात घेऊन तपासली असता ती खरी असल्याचे लक्षात आले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी लागलीच आरोपींचा शोध घेतला. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाससह एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल जप्त केले आहेत. भर रस्त्यालगत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे.
सध्या तरूणांमध्ये अशाप्रकारची हिंसा करण्याचे प्रमाण वाढले आहे. तरूण मुलामुलींमध्ये असे वारंवार घडणारे प्रकार पाहून आता पालकांनीही सतर्क होण्याची वेळ आली आहे. सध्या ही घटना सगळ्यांचे डोळे उघडणारी आहे.