प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई: हल्ली समाजात अनेक गैरप्रकार होताना दिसत आहेत. लोकांमध्ये असंतोष वाढलेला दिसत आहेत. त्यातून सध्या अशीच एक धक्कादायक (Shocking news) घटना समोर आली आहे. वसईत एका इसमाला तलवार, कोयत्याने मारहाण करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. त्यामुळे या प्रकारात सगळीकडूनच रोष आणि राग व्यक्त करण्यात आला आहे. वसईत कायदा आणि सुव्यवस्थचे अक्षरक्ष: धिंडवडे काढण्यात आले आहे. ही घटना सीसीटीव्हीत (cctv footage) कैद झाली आहे. 12 वेळा त्या व्यक्तीवर तलवारीनं वार करण्यात आले आणि 12 व्या वाराला तलवार पुर्णत: वाकली. डुक्कर पकडणाऱ्या शिकलकरी समाजाच्या गँगचा हा वॉर सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा प्रकार पाहून तुमच्याही अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. (a gang in vasai attacks man using sword cctv footage goes viral)
हल्ली अनेक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेले पाहायला मिळत आहेत. वसईत समोर आलेल्या घटनेनुसार डुक्कर पकडणाऱ्या शिकलकरी समाजाच्या गँग मधील दोन गटात झालेल्या वादात तलवारीनं हल्ला करून एकावर अमानुष पद्धतीने तलवारीनंच सपासप वार करून जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना काल वसई पूर्वेच्या (vasai naikpada) नाईकपाडा परिसरात घडली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या भयानक हल्ल्याचा संपूर्ण थरार कैद झाला असून काल संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास आरोपी व त्याच्या दोन साथीदारांनी टेम्पोतून येऊन दादू नामक इसमाच्या टेम्पोला समोरून जोरदार धडक दिली व त्यानंतर गाडीतून तलवारी व बंदूक काढून त्यांनी विरोधक असलेल्या दादूवर सपासप वार केल्याचे सीसीटीव्ही दृश्यांमध्ये दिसत आहे.
आरोपींनी यावेळी हातात बंदूक ठेवल्याने हे भांडण सोडविण्यासाठी कोणी मध्ये पडले नाही. आरोपींनी पीडित इसमावर तलवारीने तब्बल 12 वेळा वार केले या हल्ल्यात तलवार वाकली गेल्याने आरोपीने टेम्पोतून दूसरी तलवार काढली व पुन्हा वार केल्याचे सीसीटीव्ही दृश्यांमध्ये दिसून येत आहे.
आरोपी इथेच न थांबता जखमी झालेल्या इसमाला फरफटत त्यावर वार करत टेम्पोच्या मागे टाकले व तेथून पळ काढला. या भ्याड हल्ल्यात जखमी झालेल्या इसमावर रुग्णालयात (hospital) उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. दिवसाढवळ्या व भर गर्दीत झालेल्या या प्रकारमुळे वसईत कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेले पाहायला मिळत आहेत.
संध्याकाळची सहा वाजताची वेळ होती तेव्हा अचानक एक गाडी दुसऱ्या गाडीला आदळली. आम्हाला वाटलं काय अपघात झाला का परंतु अचानक एका गाडीतून लोकं उतरली आणि ठोकलेल्या गाडीतल्या माणसाला तलवारीनं जोरजोरात मारायला लागले. आम्ही वाचवायला जायचं म्हटलं तरी कसं वाचवणार? कारण दुसऱ्या-तिघांच्या हातात बंदूक होती. त्यामुळे त्यांना वाचवणं कठीण होतं. आम्हाला कळलं नाही त्यांनी त्याच्यावर का वार केला ते, परंतु हे टोळी वसईचीच आहेत आणि ते डुक्कर व्यापारी आहेत. हा हल्ला झाल्यानंतर ते पळून फरार झाले, असं प्रत्यक्षदर्शी जयेंद्र पाटील यांनी सांगितले.