Nia On School Pune Crime News : पुण्यातल्या एका शाळेत चक्क दहशतवादी प्रशिक्षण सुरू असल्याचं उघड झालंय. (School in Pune used for terrorist activities) पुण्यात पीएफआयने ब्लू बेल नावाच्या शाळेत दोन मजल्यावर दहशतवादी प्रशिक्षण सुरू केलं होतं. या शाळेत शस्त्रप्रशिक्षण आणि हल्ला करण्याचं ट्रेनिंग पीएफआयकडून दिलं जात होतं अशी माहिती समोर येतेय.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शाळेच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्याचा वापर हा देशविरोधी कृत्यांसाठी केल्याचा ठपका NIA ठेवला आहे.  22 सप्टेंबर 2022 ला या शाळेवरही छापे टाकण्यात आले होते. रविवारी एनआयएने या शाळेचे दोन मजले सील केले. मुस्लीम  तरूणांना गळाला लावून त्यांना दहशतवादी प्रशिक्षण देण्य़ासाठी या शाळेचा वापर केला जात होता असं तपासात उघड झालंय. त्यानंतर तातडीने कारवाई करत यूएपीए कायद्याअंतर्गत एनआयएने या शाळेचा चौथा आणि पाचवा मजला सील केला. 



2047 पर्यंत भारताला इस्लामिक देश बनवण्याचं पीएफआयचं लक्ष्य आहे. NIA ने गेल्यावर्षी देशभर पीएफआयच्या तळांवर छापे मारले होते. मोठ्या प्रमाणात देशभर अटकसत्र झालं होतं.



त्याचवेळी पुण्यातही या शाळेवर छापा मारला होता. त्यानंतर या शाळेत नेमकं सुरू काय होतं याचा शोध घेतला गेला. आता एनआयएने या शाळेचे दोन मजले सील केलेत.