पुणे : पुण्यातील कमला नेहरु हॉस्पिटल जवळच्या शारदा स्वीटसमध्ये असलेल्या दुकानात सामोसाच्या गोड पाण्यामध्ये उंदीर आढळून आला आहे. त्यामुळे शहरात खळबळ पसरली आहे. ढोल पथकांच्या कार्यकर्त्यांनी २०० सामोसे ऑर्डर केले होते. त्या बरोबर चिंचेची चटणीही देण्यात आली होती. मात्र त्यात मेलेला उंदीर सापडला ही चिंचेची चटणी घेऊन कार्यकर्ते दुकानात आले. 


दुकान मालक रामकिशन यांच्याकडून आरोपांचा इन्कार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालकाला जाब विचारला, तेव्हा या स्वीटच्या दुकानात स्वच्छता नसल्याचं दिसून आलं. दुकान मालक रामकिशन यांनी मात्र या सगळ्या आरोपांचा इन्कार केलाय. संबधित ग्राहक दोनशे समोसे घेऊन मुंढव्याला गेला आणि अर्ध्या तासाने परत आला. त्यामुळे ही घटना दुकानात घडली नसल्याचा दावा दुकान मालकाने केलाय.


महापालिका आणि अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दुकानाची तपासणी केलीय. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी नमुने नेलेत. तसेच, दुकान बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आली आहे.